Soil & Water Management Training


Event Start Date:
20th March 2017
Event End Date:
20th March 2017
Event Venue:
Vidarbha

For those interested in soil & water management at village level and help for same in Vidarbha region of Maharashtra, check following msg from friend farmer, Mandar Deshpande @ Wardha (please contact Mandar @ + 91 9420415648 directly to confirm participation and more details);

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो..
महाराष्ट्रामध्ये भूजल पातळी वाढावी म्हणून चालू असलेल्या पानी फाउंडेशनच्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप – २’ निमित्त चालू असलेल्या कामात संतोष व मी अनुक्रमे उमरखेड व आर्वी येथे काम करत आहोत. आर्वी येथे २६ जानेवारीच्या ग्रामसभेनिमित्त मी मदतीसाठी आवाहन केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता व २५ निर्माणी आले होते. त्या निमित्त त्यांना व आम्हालाही बरेच शिकायला मिळाले.(यात सहभागी मुलांचे अनुभव वाचा –http://simollanghan.blogspot.in/2017/03/blog-post_5.html )
त्याचाच पुढील टप्पा म्हणून ज्या गावांनी या स्पर्धेमध्ये भाग घेऊन पानी फाउंडेशन देत असलेले प्रशिक्षण घेतले आहे त्या , pls contact directly करायचे आहे. त्यासाठी गावांना technical trainerची गरज लागणार आहे.
असे Technical Trainers पानी फाउंडेशन प्रशिक्षण देऊन तयार करणार आहे. जे गावासोबत जोडून त्यांचे नियोजन करुन देतील.
काही डिटेल्स असे–
1. कालावधी – 20 मार्च ते 20 एप्रिल
2. ठिकाण- संतोषकडे उमरखेड(जिल्हा- यवतमाळ) तालुक्यात व मंदारकडे आर्वी(जिल्हा-वर्धा) तालुक्यात करायचे आहे.
3. पात्रता – तो/ती technical असल्यास उत्तम;तसे खुप अवघड technical नाहीये, (नियोजन कसे करायचे याचे 2-3 दिवसीय प्रशिक्षण असेल), त्यामुळे यासाठी पात्रता म्हणजे ‘असे काम करण्याची तळमळ असावी’ सलग 15 दिवस तरी कमीत कमी द्यावेत- ट्रेनिंग मात्र पूर्ण करावे लागेल. एकदा प्रशिक्षण पूर्ण झाले की प्रत्येकाला वा दोघा दोघाना मिळून निवडलेल्या गावाला राहून त्याचे नियोजन करावे लागेल।
4. गावात नियोजन करण्यासाठी प्रत्येक गावी 2 दिवस तरी राहावे लागेल.4-5 गावांचे तरी नियोजन करावे लागेल। त्यावेळी गावात त्यांची राहण्याची व जेवण्याची व्यवस्था होईल.
5. मानधन दिले जाईल.
ह्या कामातून तुम्हाला भरपूर शिकायला मिळेल. तर ज्यांना शक्य असेल त्यांनी या संधीचा जरुर लाभ घ्यावा.

अधिक जाणून घेण्यासाठी संपर्क करावा।
मंदार +91 9420415648

(Visited 39 times, 1 visits today)